रस्ता दुरुस्तीसाठी निवडणुकीवर बहिष्कार !

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव :- तालुक्यातील आव्हाणे बु. ते रामनगर, या रस्त्याची अंत्यत दयनिय अवस्था झाली आहे. येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी दिला आहे. आव्हाणेपासून जवळच असणाऱ्या रामनगर येथे एक हजार लोकवस्ती असून, दळणावळणाच्या दृष्टीने हा रस्ता वडुले मार्गाने शेवगावला ज़ाण्यासाठी अत्यंत ज़वळचा आहे.

सध्या या रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य व सां बां. विभागाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पावसाळा सुरू असल्याने या रस्त्यावरून पायी चालणे मुश्किल झाले आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून आव्हाणे ते रामनगर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ वशेतकरी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही हे मार्गी लागले नाही. विधानसभा निवडणुकांपूर्वी रस्त्याचे काम सुरू न केल्यास शेतकरी निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असे मोहनराव कोळगे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment