अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
आज (शुक्रवार) सकाळी त्याचा मृतदेह घरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर शेतात बंधाऱ्याच्या बाजूला विहिरीजवळ आढळून आला आहे. यावेळी हा मृतदेह अर्धवट खालेल्या अवस्थेत सापडला.
गेल्या पंधरा दिवसात या नरभक्षक बिबट्याने तीन बालकांना ठार केले आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.
काही काळ या ठिकाणच्या ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक यांच्यासह वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.
या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून होत आहे. एकूणच या घटनेने नागरिकांमध्ये बिबट्याची आणखी मोठी दहशत वाढली आहे.
दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या भागास भेट दिली. येत्या दहा दिवसांत बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved