मशरूम शाकाहारी आहे की मांसाहारी?, खरं उत्तर ऐकून धक्का बसेल!

Published on -

आपण मशरूमची भाजी आवडीने खात असाल, तर ही बातमी तुमचा संपूर्ण समजच बदलू शकते. कारण जे आपण आजवर “शुद्ध शाकाहारी” म्हणून समजून खात आलो आहोत, त्यामागचं सत्य अनेकांच्या मनाला हादरवणारं आहे. मशरूम म्हणजे नक्की काय? हे खरंच शाकाहारी आहे का, की नकळत आपण मांसाहारी गोष्ट खाऊन बसलो आहोत? याबाबत या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

मशरूमचा उल्लेख आला की काहींना त्याची चव आठवते, काहींना त्याचं पोषणमूल्य. पण त्याचवेळी अनेकजण या पदार्थाबाबत संभ्रमात असतात. काही लोक याला शाकाहारी मानतात, तर काहीजण त्याला मांसाहारी समजतात. अनेक वर्षे मशरूमचा समावेश आपल्या जेवणात आहे. मात्र आपण त्याची खरी ओळख आणि त्याचं मूळ लक्षात घेतलं आहे का?

मशरूम

मशरूम ही वनस्पती नाही आणि प्राणीही नाही. ती बुरशीच्या वर्गात मोडते, म्हणजेच ती एक फंगस आहे. ती माती, झाडांचे खोड किंवा कुजलेल्या जैविक पदार्थांवर वाढते. आपण जी वनस्पती खातो, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं, जे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतं. मात्र मशरूममध्ये क्लोरोफिल नसतं. त्यामुळे ती स्वतः अन्न तयार करत नाही, तर आसपासच्या सेंद्रिय पदार्थांपासून पोषण घेतं.

याचमुळे काही लोक याला “मांसाहारी पोषण” असलेला पदार्थ म्हणतात. मशरूममध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजांचं प्रमाण भरपूर असतं. विशेष म्हणजे यामध्ये असणारी पोषणमूल्यं काही प्रमाणात मांसाहारी आहारासारखी वाटतात. पण हा मांसाहारासारखा पोषणमूल्य असलेला पदार्थ कोणत्याही सजीव प्राण्यापासून तयार होत नाही.

मशरूम शाकाहारी की मांसाहारी?

शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, तर मशरूम मांसाहारी नाही. फक्त त्याची उगमशैली आणि पोषण घेण्याची पद्धत पारंपरिक शाकाहारी गोष्टींपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञ मशरूमला शाकाहारी श्रेणीतच ठेवतात. मात्र काही धार्मिक विश्वास आणि आस्थेमुळे काही लोक याला मांसाहारी मानतात. खरं सांगायचं झालं, तर मशरूम हा ना शाकाहारी ना मांसाहारी तो वेगळ्याच प्रकारात मोडणारा एक जैविक घटक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!