Gold Rate : सोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर 23 जून ते 30 जून या कालावधीत सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात पण नंतर म्हणजेच एक जुलैपासून पुन्हा एकदा याच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली.
एक जुलैपासून ते तीन जुलै पर्यंत या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी वाढ झाली. 3 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचली. 23 जूनला सोन्याची किंमत एका लाखाच्या वर होती आणि तीन जुलैला किंमत एका लाखाच्या अगदी जवळ पोहोचली होती.

यामुळे जून महिन्याप्रमाणेच जुलै महिन्यातही सोन्याची किंमत एका लाखाच्या वर जाणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. पण अखेर कार सोन्याच्या दरवाढीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळतोय तर दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चिंता सुद्धा वाढत आहे. काल आणि आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.
काल 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 600 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 550 रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान आजही या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाली असून आता आपण सध्या स्थितीला 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.
18 कॅरेट सोन्याचे रेट
आज महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
22 कॅरेट सोन्याचे रेट
आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 490 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 520 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
24 कॅरेट सोन्याचे रेट
आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.