Zodiac Sign : सध्या संपूर्ण महाराष्ट्र बा – विठोबाच्या भक्तीत तल्लीन आणि रममान झाला आहे. विठोबा-रखुमाई, विठोबा-रखुमाई ह्या नामस्मरणात पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. कारण की उद्या देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक भक्तांची लाट येत असते. यंदाही आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
दरम्यान यंदाची देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. कारण की आषाढी एकादशीला काही राशीच्या लोकांचा भाग्योदय होईल. उद्या अर्थातच सहा जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी सोहळा संपन्न होत आहे आणि याच दिवशी काही ग्रहांचा खास संयोग सुद्धा दिसतोय.

यावर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी गुरू आदित्य राजयोग तसेच साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योग निर्माण होत असल्याची माहिती पंचांगातून समोर येत आहे. यामुळे उद्यापासून राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
धनु : देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खास ठरणार असे बोलले जात आहे. कारण, उद्या या राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासूनची अडकलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.
या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुरु ग्रहाच्या कृपेने आणि आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे हे लोक कार्यसिद्धी पर्यंत पोहोचतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या सहकार्यांकडून तसेच वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळणार आहे. हा काळ या लोकांसाठी शत्रूवर विजय मिळवणारा काळ ठरणार आहे.
कन्या : धनु राशि प्रमाणेच कन्या राशीच्या लोकांसाठी देखील सहा जुलैचा दिवस विशेष खास राहील. या राशीच्या जातकांना आषाढी एकादशीच्या दिवशी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. या काळात या लोकांना नोकरीत अपेक्षित यश प्राप्त होईल.
जर कठोर मेहनत घेतली तर नक्कीच चांगले यश मिळणार आहे. या काळात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वडिलांबरोबरचे संबंध बळकट होतील आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभणार आहे. या लोकांच्या मनातील इच्छा या काळात पूर्ण होतील असे संकेत मिळत आहेत.
कर्क : धनु आणि कन्या राशीच्या लोकांप्रमाणेच कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा मोठी एकादशी अर्थातच आषाढी एकादशी विशेष लाभदायक ठरेल. या राशीचे जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना या काळात नवीन नोकरीची संधी मिळू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांना बिजनेस मध्ये चांगला नफा मिळणार आहे.
भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. या लोकांना धनलाभ होण्याचेही संकेत मिळत आहेत. कुटुंबात अगदीच आनंदाचे वातावरण राहील. भावंडांकडून अनमोल सहकार्य मिळेल आणि विशेष म्हणजे या लोकांना धार्मिक कार्यात समाधानाची प्राप्ती होणार आहे.