कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! मारुती सुझुकीच्या या लोकप्रिय कारवर मिळणार 70,000 रुपयांचा डिस्काउंट, कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर?

सध्या अनेकजण नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. तुमचाही असा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे. खरे तर मारुती सुझुकी या कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारवर डिस्काउंट ऑफर सुरू केला आहे. आज आपण याच ऑफरची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Maruti Suzuki Discount Offer : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक  खास राहणार आहे, कारण की कंपनीकडून आपल्या एका लोकप्रिय कारवर तब्बल 70 हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आली आहे.

यामुळे जर तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन कार खरेदी करायची असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. खरेतर, मारुती सुझुकी इंडियाने नेक्सा डीलरशिपवर उपलब्ध असलेल्या सर्व मॉडेल्सवर आता डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. यात कंपनीच्या एका साता समुद्रापार प्रसिद्ध अशा कारचा सुद्धा समावेश आहे.

कंपनीची ऑफ-रोडिंग जिमनी एसयूव्ही या कारवर सुद्धा डिस्काउंट ऑफर सुरू आहे. कंपनी या कारवर 70 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट देत आहे. अशा परिस्थितीत आता आपण या लोकप्रिय SUV वर सुरु असणारी ही डिस्काउंट ऑफर नेमकी कशी आहे? याची तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे डिस्काउंट ऑफर? 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीच्या या लोकप्रिय कारवर गेल्या काही महिन्यांपासून डिस्काउंट ऑफर सुरू आहे. या महिन्यात सुद्धा ही कार खरेदी करणाऱ्यांना डिस्काउंट ऑफरचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी कंपनी जिमनी एसयूव्हीवर 1 लाख रुपयांची सूट देत होती.

पण या चालू महिन्यात या गाडीवर फक्त 70 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. जिमनीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.76 लाख रुपये इतकी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी खरेदी करणाऱ्या भारतीय ग्राहकांना मोठी सूट दिली जात आहे.

पण असे असतानाही इंडियन कार मार्केटमध्ये या गाडीला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये, मात्र ग्लोबल मार्केटमध्ये ही गाडी धुमाकूळ घालत आहे. विशेषता जपानमध्ये या गाडीला जोरदार प्रतिसाद मिळतोय. दरम्यान आता आपण या गाडीचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स याबाबत माहिती पाहणार आहोत.

गाडीचे इंजिन कसे आहे? 

मारुती सुझुकीची लोकप्रिय जिम्नी या SUV मध्ये ग्राहकांना 1.5 लिटरचे चार-सिलेंडर K15B माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन कमाल 105 एचपी पॉवर आउटपुट आणि 134 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. हे पेट्रोल इंजिन 5-स्पीड एमटी म्हणजेच मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4-स्पीड एटी म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

कसे आहेत फीचर्स?

या गाडीच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स बाबत बोलायचं झालं तर या भन्नाट कार मध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएमएस, वॉशरसह फ्रंट आणि रीअर वायपर, डे अँड नाईट आयआरव्हीएम, पिंच गार्डसह ड्रायव्हर-साइड पॉवर विंडो ऑटो अप/डाउन, रिक्लाइनेबल फ्रंट सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टीफंक्शनल स्टीअरिंग व्हील, टीएफटी कलर डिस्प्ले, फ्रंट आणि रीअर सीट अॅडजस्टेबल हेडरेस्ट, फ्रंट आणि रीअर वेल्डेड टो हुक असे प्रीमियम फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या गाडीत स्टील व्हील्स, ड्रिप रेल आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सुद्धा देण्यात आली आहे. यामुळे ही गाडी चालवताना ग्राहकांना एक वेगळाच अनुभव मिळतोय.

शिवाय यात अल्फा ग्रेड अलॉय व्हील्स, बॉडी कलर डोअर हँडल, वॉशरसह एलईडी ऑटो हेडलॅम्प, फॉग लॅम्प, गडद हिरवे काच, पुश बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, लेदर स्टीअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 9-इंचाची स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आर्कामिस सराउंड साउंड देखील देण्यात आले आहेत. 

 सेफ्टी फीचर्स कसे आहेत 

ही गाडी ग्राहकांसाठी सुरक्षित बनवण्याच्या अनुषंगाने कंपनीने यात अनेक फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. सेफ्टी फीचर्स म्हणून या गाडीमध्ये स्टॅंडर्ड ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, EBD सह अँटी-लॉक ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, साइड इम्पॅक्ट डोअर बीम, इंजिन इमोबिलायझर आणि थ्री पॉइंट इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर सीटबेल्ट असे भन्नाट सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. यामुळे ही गाडी पूर्णपणे सुरक्षित बनते शिवाय ऑफ रोडींग साठी देखील हे फिचर्स फायद्याचे ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!