विवाहित लोकांसाठी Post Office ची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार 1,11,000 रुपये व्याज, किती गुंतवणूक करावी लागणार ?

जर तुम्हीही विवाहित असाल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची एक योजना फायद्याची ठरणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करून दरवर्षी एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळवू शकता. 

Published on -

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात आहात का मग तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. अलीकडे, बँकांकडून एफडी योजनेचे व्याज मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपातीचा निर्णय घेतला आणि तदनंतर देशभरातील बँकांकडून एफडी व्याजदर कमी करण्यात आलेत. पण पोस्टाच्या बचत योजना याला अपवाद ठरत आहे.

रेपोरेट जवळपास एक टक्क्यांनी कमी झाले असतानाही पोस्टाच्या बजेट योजनांमध्ये आजही पूर्वीप्रमाणेच दिले जात आहे. म्हणूनच सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस चा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की यातून गुंतवणूकदारांना आजही चांगले व्याज मिळत आहे.

दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जी की विवाहित लोकांसाठी खास ठरणार आहे. लग्न झालेल्या लोकांनी जर आपल्या पत्नी समवेत किंवा आपल्या पतीसमवेत या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून एकर कमी गुंतवणूक केली तर त्यांना दरवर्षी एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. 

कोणती आहे ही योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम म्हणजे POMIS योजना. ही योजना लग्न झालेल्या लोकांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की यात गुंतवणूकदार आपल्या जोडीदारासमवेत एक रकमी गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवू शकतो.

याशिवाय दहा वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावाने देखील यामध्ये गुंतवणूक करता येते. या योजनेबाबत बोलायचं झालं तर यात किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते.

मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये सिंगल अकाउंट ओपन केल्यास कमाल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास कमाल 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. योजनेच्या गुंतवणुकीवर दरमहा एक फिक्स व्याज मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे हे व्याज गुंतवणूकदाराच्या बचत खात्यात वर्ग केले जाते.

ही योजना पाच वर्ष कालावधीची आहे मात्र योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला ही योजना आणखी एक्सटेंड सुद्धा करता येते. म्हणजेच पाच – पाच वर्षांनी ही योजना आणखी वाढवता येईल. दरम्यान या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

विवाहित लोकांना कसे मिळणार एक लाख 11 हजार रुपये?

POMIS योजनेत जर पती आणि पत्नी यांनी जॉईंट अकाउंट ओपन करून कमाल 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना सध्याच्या 7.4% दरानुसार दरवर्षी एक लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.

म्हणजेच एका जोडप्याला पंधरा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून दरमहा 9 हजार 250 रुपयांचे फिक्स व्याज मिळणार आहे. जर समजा एखाद्या ग्राहकाने सिंगल अकाउंट ओपन केले आणि यामध्ये कमाल नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दरवर्षी 66 हजार 600 रुपयांचे व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!