काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता

भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत तर काही प्रजाती विषारी आहेत. विषारी सापांच्या प्रजाती देशात फारच कमी आहेत पण तरीही देशात साप चावल्यामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान आज आपण साप विषारी आहे की बिनविषारी हे कसे ओळखायचे? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे आणि यामुळे देशात सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. खरंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरते आणि यामुळे ते अन्नाच्या शोधात आणि निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसतात. हेच कारण आहे की या दिवसांमध्ये साप चावण्याची भीती सर्वाधिक असते. वास्तविक, आपल्या देशात सापांच्या फारच मोजक्या प्रजाती विषारी आहेत.

मात्र असे असतानाही देशात दरवर्षी सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर दरवर्षी भारतात 30 ते 40 लाख सर्पदंशाची प्रकरणे समोर येतात. महत्त्वाची बाब अशी की, यापैकी 50 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

हेच कारण आहे की, आपण सर्वजण सापांना प्रचंड घाबरतो. दरम्यान आज आपण सापांबाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे हे कसे ओळखायचे याबाबत आज आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. 

साप विषारी आहे की बिनविषारी हे कसे ओळखणार?

साप चावल्यानंतर तो साप विषारी होता का बिनविषारी हे ओळखण्यासाठी एक छोटीशी गोष्ट तपासली पाहिजे. जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे जर विषारी साप चावला असेल तर साप ज्या ठिकाणी चावतो त्या ठिकाणी तुम्हाला दोन दातांचे निशान दिसेल.

पण जर साप बिनविषारी असेल तर ज्या ठिकाणी साप चावतो त्या ठिकाणी तुम्हाला दोन पेक्षा अधिक दातांचे निशाण पाहायला मिळणार आहे. तज्ञ सांगतात की, धामण हा एक बिनविषारी जातीचा साप आहे आणि हा भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो.

आपल्या महाराष्ट्रात देखील या बिनविषारी सापाचा मोठा वावर आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हा साप आढळतो. मात्र जेव्हा हा साप चावतो त्या ठिकाणी तुम्हाला अनेक दातांचे निशाण पाहायला मिळते. दातांच्या निशाणा व्यतिरिक्त तुम्ही लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे.

विषारी साप चावल्यानंतर त्या सापाचे विष शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे दिसून येऊ शकतात. तथापि साप विषारी असो किंवा बिनविषारी साप चावल्यानंतर सर्वप्रथम वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. यामुळे साप विषारी असो किंवा बिनविषारी तो चावल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जवळील सरकारी दवाखान्यात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यायला विसरू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!