Post Office Scheme : तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना एक रकमी गुंतवणूक करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी आजचा हा लेख विशेष फायद्याचा राहणार आहे. कारण आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेत गुंतवणूकदारांना एक रकमी पैसा गुंतवावा लागत नाही. दरमहा एक छोटी रक्कम गुंतवून गुंतवणूकदारांना या योजनेतून एक मोठा फंड तयार करता येतो.
या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर पोस्टाकडून चांगले व्याजही दिले जाते. दरम्यान आता आपण पोस्टाच्या आरडी योजनेची डिटेल माहिती पाहणार आहोत, या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळते, यात दरमहा 26 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार? याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

कशी आहे पोस्टाची आरडी योजना
बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच पोस्ट ऑफिसकडूनही फिक्स डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे, पोस्टाच्या फिक्स डिपॉझिट योजनेला टाईम डिपॉझिट योजना म्हणून ओळखले जाते. याशिवाय बँकांच्या आरडी योजनेप्रमाणेच पोस्टाकडूनही आरडी योजना सुरू करण्यात आली आहे. पोस्टाच्या आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदाराला दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवावी लागते.
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 6.7% दराने व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेचे खाते पाच वर्षात म्हणजेच 60 महिन्यांनी परिपक्व होते. म्हणजेच यात गुंतवलेली रक्कम 60 वर्षांनी व्याजासहित परत मिळते. आता आपण याच 6.7% दराने व्याज दिल्या जाणाऱ्या पोस्टाच्या आरडी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 2 हजार 600 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर किती पैसे मिळणार याचा आढावा घेऊयात.
2,600 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?
पोस्टाची आरडी योजना 60 महिन्यात परिपक्व होते. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या या आरडी योजनेत दरमहा 2 हजार 600 रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 60 महिन्यांनी एक लाख 85 हजार 556 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक एक लाख 56 हजार रुपये इतकी असेल. तर उर्वरित पैसे म्हणजेच 29 हजार 556 रुपये व्याज स्वरूपात सदर गुंतवणूकदाराला रिटर्न मिळणार आहेत.