पोटच्या गोळ्याचा जीव घेत त्याने स्वतःही फाशी घेत संपवली जीवनयात्रा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कर्जबाजारीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या अनेक घटना आजवर ऐकल्या असतील.

मात्र याच कर्जबाजारी पणाला कंटाळून खुद्द बापाने आपल्या चिमुरडीचा गळा दाबून खून केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी मध्यरात्री स्वतः च्या तीन वर्षीय मुलीचा तोंड दाबून खून करून स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे वय ४७ याने गुरुवारी रात्री ११ वाजेनंतर स्वतः च्या तीन वर्षाच्या अदिरा पळंदे हिच्या तोंडावर उशी दाबून तिचा जागीच खून केला.

त्यानंतर अनिल याने घराच्या छताला नायालान दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चौकशी केली असता अनिल यांच्यावर सहकारी संस्थांचे कर्ज होते.

अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली होती. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे पिके कशी उभी करायची या विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे कळते आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment