Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किमतीत आज मोठी घसरण झालीये. खरंतर गेल्या काही दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने बदल होतोय. कधी याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते तर कधी याची किंमत कमी होते.
यामुळे ग्राहकांमध्ये तसेच गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. काल, आठ जुलै 2025 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. सात जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 550 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत पाचशे रुपयांनी वाढली.

आज मात्र सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दरम्यान आता आपण आठ जुलै 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि तू हीच कॅरेक्टर रेट कसे आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत
आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. आज या सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 660 रुपयांनी कमी झाले आहेत.
22 कॅरेट सोन्याची किंमत
आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. या सर्व शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 600 रुपयांनी कमी झाली आहे.
18 कॅरेट सोन्याची किंमत कशी आहे
आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. आज राज्यातील या सर्व शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत आज 490 रुपयांनी कमी झाली आहे.