अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील काही अज्ञातांनी हल्ला केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मापारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
या भ्याड हल्ल्यामध्ये मापारी गंभीर जखमी झाले असून, या गुंड प्रवृत्तीचा निषेध करत हल्लेखोरांना तातडीने अटक करा अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस व राहाता तालुका काँग्रेस समितीच्यावतीने
तालुका पोलिसांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला हल्लेखोरांना अटकेच्या मागणीचे निवेदन दोन्ही काँग्रेसच्यावतीने देण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved