पारनेर :- नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात झालेल्या अपघातात अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे सव्वाच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अकरा जण जखमी झाले आहेत.
लक्ष्मी वसंत दोमल (वय ६५, रा. सातभाई गल्ली, तोफखाना), विश्वनाथ बाळराम बिमन (वय ५०), ओंकार विश्वनाथ बिमन (वय १०, दोघेही रा. लोणार गल्ली, नगर) यांचा यात मृत्यू झाला.
जखमींमध्ये किसन बलराज बिमन (रा. पाइपलाइन रोड, सावेडी), सुषमा वसंत ऐनगंदूल (रा. श्रमिकनगर, सावेडी), उज्ज्वला शंकर बिमन (शिवाजीनगर, कल्याण रोड), सौंदर्या शंकर बिमन (वय १०), रामचंद्र बलराज बिमन (रा. सर्जेपुरा), वज्राबाई दत्तात्रय बिमन (शिवाजीनगर, नेप्ती नाका), शंकर दत्तात्रय बिमन (कल्याण रोड) यांचा समावेश आहे.
नगर शहरातील बिमन व दोमल हे एकमेकांचे नातेवाईक ट्रॅव्हलर गाडीने आळंदी येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना जातेगाव घाटात समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोचा टायर फुटला. तो दुभाजक ओलांडून मिनीबसवर धडकला. या धडकेत बसमधील लक्ष्मी दोमल व विश्वनाथ बिमन जागीच ठार झाले, तर ओंकार बिमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात सुमारे अकरा जण जखमी झाले.
- चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी
- महानगरपालिकेत सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नोंद करणे बंधनकारक! आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन
- Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे
- पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम