Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का मग तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. खरंतर अलीकडील काही महिन्यांमध्ये देशभरातील बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केले आहेत. देशातील जवळपास सर्वच बँकांनी एफडीचे व्याजदर घटवलेले आहेत. कारण म्हणजे आरबीआयने रेपो रेट कमी केलेत.
आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील अनेक बँकांनी एफडी चे व्याजदर कमी केलेले आहेत मात्र आजही पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांचे व्याजदर कायम आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर आजही कायम आहेत.

दरम्यान आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये दरवर्षी 25 हजाराची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर किती फंड मिळणार याचा सुद्धा आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत.
कशी आहे पीपीएफ योजना
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक गव्हर्मेंट योजना आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये अकाउंट ओपन करायचे असेल तर बँकेतही अकाउंट ओपन करता येते आणि पोस्ट ऑफिस मध्ये जाऊनही या योजनेत गुंतवणूक केली जाऊ शकते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेबाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे.
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पंधरा वर्षाचा आहे. याचे विशेषता अशी की पंधरा वर्षाचा काल पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना पाच – पाच वर्षांनी या योजनेचा कालावधी वाढवता येत असतो.
या योजनेत गुंतवणूकदारांना किमान 500 रुपये आणि कमाल दीड लाख रुपये वार्षिक गुंतवता येतात. म्हणजेच एका वर्षात गुंतवणूकदारांना कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात.
दरवर्षी 25 हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार
पीपीएफ योजनेत दरवर्षी पंचवीस हजार रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर म्हणजेच 15 वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना 7.10% दराने सहा लाख 78 हजार 35 रुपये मिळणार आहेत.
त्यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक तीन लाख 75 हजार रुपये इतकी असणार आहे आणि उर्वरित पैसे हे व्याजाचे असतील. त्याचवेळी जर पीपीएफ योजनेत दरवर्षी 25 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि ही गुंतवणूक 25 वर्षांसाठी कायम ठेवली तर गुंतवणूकदाराला 17 लाखाहून अधिक रक्कम मिळणार आहे.