मुकेश अंबानी यांचे अँटिलिया नाही तर ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक महागडे घर ! 400000000000 रुपयांच्या सर्वाधिक महागड्या घराचा मालक कोण?

मुकेश अंबानी यांचे 1500 कोटी रुपयांचे घर हे भारतातील सर्वाधिक महागडे घर म्हणून ओळखले जाते. पण तुम्हाला जगातील सर्वाधिक महागड्या घरांची माहिती आहे का? नाही, मग आज आपण जगातील सर्वाधिक महागडे घर कुठे आहे आणि याचा मालक नेमका कोण याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Most Expensive Home : सर्वसामान्यांपासून ते गडगंज श्रीमंत लोकांपर्यंत सर्वांचे स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. स्वप्नातील घरासाठी आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करतो. आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती आपण आपल्या घरासाठी खर्च करतो.

पण, तुम्हाला जगातील सर्वाधिक महागडे घर कोणते याची माहिती आहे का? नाही. मग आज आपण जगातील सर्वाधिक महागड्या घराची माहिती पाहणार आहोत. खरंतर महागड्या घरांचा विषय निघाला म्हणजेच आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव आवर्जून घेतले जाते.

मुकेश अंबानी यांचे मुंबईतील घर हे मुंबईतीलच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक महागडे घर आहे. मुकेश अंबानी यांचे घर चक्क 1500 कोटी रुपयांचे घर असून ते भारतातील सर्वाधिक महागडे घर म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पण आज आपण अशा एका घराची माहिती पाहणार आहोत जे की मुकेश अंबानी यांच्या घरापेक्षाही महाग आहे. 

हे आहे जगातील सर्वाधिक महागडे घर 

जगातील सर्वाधिक महागड्या घराची किंमत 40 लाख कोटी रुपये इतकी आहे. बकिंगहॅम पॅलेस हे जगातील सर्वाधिक महागडे घर असून ते लंडनमध्ये आहे. हे ब्रिटिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान असून ही मालमत्ता ब्रिटिश सरकारची आहे.

या घरात ब्रिटिश राजघराणे वास्तव्याला आहेत मात्र ही मालमत्ता तेथील सरकारची आहे. या पॅलेस बाबत बोलायचं झालं तर जगातील सर्वाधिक महागड्या या पॅलेसमध्ये तब्बल 775 खोल्या आहेत. यात 78 बाथरूम आणि 1500 हून अधिक दरवाजे आहेत.

775 खोल्यांपैकी 52 खोल्या या फक्त राजघराण्यासाठी आहेत. 188 खोल्या पाहुण्यांसाठी आहेत आणि 92 खोल्या ह्या फक्त नोकर आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या राजवाड्याचे एकूण क्षेत्रफळ 77 हजार चौरस मीटर इतके असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या राजवाड्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे इथे एक एटीएम सुद्धा आहे जे की फक्त राजघराण्यातील लोकांसाठी बसवण्यात आले आहे. हे घर बकिंगहॅमच्या ड्यूकने 300 वर्षांपूर्वी बनवले होते. पुढे 1837 मध्ये राणी व्हिक्टोरिया यांनी या पॅलेसला आपले घर बनवले.

या राजवाड्यात जवळपास 800 कर्मचारी काम करतात अशी नोंद आहे. या पॅलेसमध्ये वैयक्तिक चॅपल, पोस्ट ऑफिस, हॉस्पिटल आणि सिनेमा हॉल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. या राजवाड्यात 40 एकरांचे एक उद्यान सुद्धा आहे.

इथे हेलिकॉप्टरसाठी एक हेलिपॅड बनवण्यात आले आहे तसेच एक तलाव सुद्धा आहे. म्हणजेच या राजवाड्यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पण हा राजवाडा न भाड्याने देता येतो न याला विकता येऊ शकते कारण की ही मालमत्ता ब्रिटिश सरकारची आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!