अहमदनगर Live24 टीम,1 नोव्हेंबर 2020 :- नाशिक परिक्षेत्रातून नगरमध्ये बदलून आलेले पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांची बदली वादात सापडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी शिंदे यांनी बदली करून घेतली,
असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तोफिक शेख यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शिंदे मूळचे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. यापूर्वी त्यांनी साडे सहा वर्ष जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये काम केलेले आहे.
पोलिस दलात सेवा बजावत असताना एका परिक्षेत्रात आठ वर्ष काम करता येते. शिंदे यांची २०१९ मध्ये जिल्ह्यातून नाशिक येथे बदली झाली होती.
दरम्यान, नव्याने निघालेल्या बदली आदेशात शिंदे यांना पुन्हा नगर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. शिंदे यांची ही बदली नियमबाह्य आहे. ती रद्द करावी, अशी मागणी शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved