हे’ आहेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भारतात आढळणारे टॉप 10 साप ! पहा यादी….

भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. दरम्यान आज आपण भारतात आढळणाऱ्या टॉप 10 सापांच्या जाती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या सापांची माहिती पाहणार आहोत ते बहुदा पावसाळ्यामध्ये दिसतात.

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अचानकपणे सर्पदंशाच्या घटना सुद्धा वाढल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरते आणि यामुळे साप निवाऱ्याच्या आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वाटचाल करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या आजूबाजूला अडगळीच्या ठिकाणी साप निघण्याची भीती अधिक असते. एका आकडेवारीनुसार भारतात जवळपास 80 ते 90 हजाराच्या आसपास लोक सर्पदंशामुळे मरतात. त्यामुळे साप दिसला की पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहता क्षणी अंगावर काटा उभा राहतो. मात्र भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळत असल्या तरी देखील त्यापैकी बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत. दरम्यान, आज आपण भारतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या 10 सापांच्या जाती प्रामुख्याने आढळतात याबाबतची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आढळणारे टॉप 10 साप

Rat Snake : धामण हा भारतात आढळणारा एक बिनविषारी साप. याचा आकार आणि वेग यामुळे या सापाला अनेकजण कोब्रा समजतात. पण हा रॅट स्नेक पूर्णपणे बिनविषारी असतो. उंदीर आणि बेडूक हे या सापाचे भक्ष आहे आणि यामुळेच या सापाला रॅट स्नेक म्हणतात. हा साप पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक दिसतो.

नानेटी : नानेटी या सापाला इंग्रजीत Bronze-back Tree Snake नावाने ओळखले जाते तसेच या सापाचे शास्त्रीय नाव डेन्ड्रेलॅफिस ट्रिस्टिस असे आहे. हा एक वृक्षसर्प आहे आणि निमविषारी आहे. सर्पमित्रांनी सांगितल्याप्रमाणे हा साप जलद, सावध आणि सहसा झाडांवर आढळतो. पण जेव्हा पाऊस जोरात पडतो तेव्हा तो निवारा शोधत खाली येऊ शकतो. कधीकधी हा साप मानवी वस्तीत सुद्धा आढळून येतो. हा साप निमविषारी असतो आणि लोकांना टाळत असतो. म्हणजे या सापाचा माणसाला कुठलाच धोका नसतो.

चापडा किंवा हिरवा घोणस : चापडा या सापाला इंग्रजीत Bamboo Pit Viper या नावाने ओळखले जाते. हा एक विषारी साप आहे. या सापाचे शास्त्रीय नाव Trimeresurus gramineus असे आहे. हा साप प्रामुख्याने जंगलात आढळतो. विशेषतः दक्षिण किंवा ईशान्य भागातील जंगलांमध्ये या सापाचा अधिक वावर असल्याचे सांगितले जाते. हा साप जंगलातच राहणे पसंत करतो. पावसाळी वातावरण या सापाला अधिक आवडते.
मलबार चापडा : हा एक विषारी साप आहे आणि या सापाचे इंग्रजी नाव Malabar Pit Viper असे आहे. छद्मवेषात माहिर असणारा हा साप बहुतेकदा पश्चिम घाटात आढळतो. हा साप झाडांच्या फांद्यावर किंवा पायवाटेवर बसतो. पावसाळ्यात हा साप अधिक सक्रिय असतो परंतु हा सभोवतालच्या वातावरणात इतका चांगला मिसळतो की याला ओळखणे सहजासहजी शक्य होत नाही.

अजगर : या सापाला इंग्रजीत Indian Rock Python या नावाने ओळखले जाते. हा एक बिनविषारी जातीचा साप असून आकाराने सर्वाधिक मोठा बिनविषारी साप म्हणून ओळखला जातो. अजगरला वर्ध्याकडे चितीन, उत्तर कोकणात आर, विदर्भात चित्री, गडचिरोली मध्ये मासुल, गोव्यात मांडोल आणि चंद्रपूर मध्ये अहार या नावाने सुद्धा ओळखले जाते.

फुरसे : या जातीला इंग्लिशमध्ये Saw-scaled Viper या नावाने ओळखले जाते. हा एक विषारी साप असून भारतात आढळणाऱ्या टॉप चार-पाच विषारी जातींमध्ये याचाही समावेश केला जातो. या सापाच्या चावण्यामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. हे साप महाराष्ट्रातील कोंकण विभागात विशेषता रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतात असे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. राज्यातील काही भागांमध्ये या जातीला फरुड या नावाने सुद्धा ओळखले जाते.

घोणस : घोणस या सापाला इंग्रजी मध्ये Russell’s Viper या नावाने ओळखले जाते आणि हा एक विषारी साप आहे. भारतातील टॉप चार विषारी सापांमध्ये या सापाचाही समावेश केला जातो. घोणस चावताना एखाद्या कुकरच्या शिट्टी प्रमाणे फुत्कारतो.

मन्यार : या सापाला इंग्रजीमध्ये Common Krait या नावाने सुद्धा ओळखतात. भारतात ज्या विषारी सापांच्या प्रमुख जाती आहेत त्या सापांमध्ये याचाही समावेश होतो. हा विषारी साप चावल्यानंतर लवकर समजत नाही आणि यामुळे या सापाचा सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या जातीचे साप देखील मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीमध्ये दिसतात.
नाग : नाग हा देशातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक आहे. याला इंग्रजी मध्ये इंडियन कोब्रा म्हणून ओळखले जाते. इंडियन कोब्रा हा मध्यम आकाराचा आणि जड शरीराचा सरपटणारा प्राणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!