8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.
यामुळे नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि 31 डिसेंबर 2035 ला हा आयोग समाप्त होणार अशी माहिती जाणकारांकडून हाती येत आहे. अर्थातच सध्याच्या सातवा वेतन आयोगाची समाप्ती 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे.

दरम्यान केंद्रातील सरकारकडून 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली असून नियोजित वेळेत नवा आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला की राज्य कर्मचाऱ्यांना देखील आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.
अशा स्थितीत आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पे स्केल वाईज किती वाढणार याबाबतची माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढणार पगार ?
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर नुसार ठरतो. सध्याच्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. सातव्या वेतन आयोगात याच फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18 हजार रुपये इतका निश्चित करण्यात आला होता तर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 15 हजार रुपये इतका निश्चित झाला होता.
पण आता नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.00× इतका असू शकतो अशी माहिती हाती आली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 30 हजार रुपये होणार आहे.
अर्थातच आठव्या वेतन आयोगात लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार तीस हजार रुपये होईल. तसेच लेवल 2, 3, 4, 5,6,7,8,9,10,11,12,13, 14 आणि 15 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अनुक्रमे 30 हजार 600, 33 हजार 200, 34 हजार 200, 36 हजार , 39 हजार 800, 43 हजार 400,
51 हजार, 52 हजार आठशे, 58 हजार 400, 60 हजार 200, 64 हजार, 70 हजार 800, 77 हजार दोनशे आणि 83 हजार 600 इतका होणार आहे. तथापि हा एक फक्त अंदाज आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? हे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच समोर येणार आहे.