Viral News : भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश. आपल्या देशाची लोकसंख्या ही जवळपास दीडशे कोटींच्या घरात पोहोचली आहे आणि लोकसंख्याच्या बाबतीत आपण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी चीनला मागे सोडले आहे. आपल्या देशात एकूण 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात. प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती असं सार काही भिन्न आहे.
देशात शेकडो बोलीभाषा आहेत. आपल्या देशाची खाद्य संस्कृती देखील प्रत्येक मैलावर बदलते. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ पाहायला मिळतात. त्या त्या भागातील खाद्य संस्कृती वरून त्या भागाला एक वेगळी ओळखही मिळते. जसे की पुरणपोळी. ही महाराष्ट्रातच बनवली जाते. यामुळे पुरणपोळी ही महाराष्ट्राची ओळख बनलेली आहे.

खरेतर, शाकाहारी लोकांच्या बाबतीत आपला भारत देश हा जगात आघाडीवर आहे. मात्र आज आपण अशा एका राज्याची माहिती पाहणार आहोत जिथे जवळपास सर्वच लोकं मांसाहार करतात. मीडिया रिपोर्टनुसार, भारतात असेही एक राज्य आहे जिथे तब्बल 99 टक्के लोक मांसाहारी आहेत.
कोणते आहे ते राज्य ?
आम्ही ज्या राज्याबाबत बोलत आहोत तेथील 99% जनता मांसाहारी आहे म्हणजेच नॉन व्हेजिटेरियन आहे आणि तुम्हाला येथे शोधूनही व्हेजिटेरियन व्यक्ती सापडणार नाही. आम्ही ज्या राज्याबद्दल बोलत आहोत ते भारताच्या ईशान्येला आहे. नागालँड असे त्याचे नाव.
नागालँड हे भारतातील असे एक राज्य आहे जे की भारताच्या संस्कृतीची विविधता दर्शवते. या राज्यात तुम्हाला अशा काही गोष्टी पाहायला मिळतील ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. खरेतर, नागालँड या राज्यात असणाऱ्या काही प्राचीन आदिवासी जमातीच्या चालीरीती या फारच आश्चर्यकारक आहे आणि या चालीरीतीमुळे येथील संस्कृतीचे दर्शन घडते.
नागा लोकांची संस्कृती ही फारच प्राचीन आहे आणि येथील लोक आपल्या संस्कृतीचे पालन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. या राज्याची खाद्य संस्कृती देखील पूर्णपणे भिन्न आहे. मीडिया रिपोर्टनुसार येथील जनता औषधी कारणांसाठी वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खातात.
येथे तुम्हाला मोठे मोठे मीट मार्केट पाहायला मिळतील. कारण येथील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या मांसाहारी आहे. नागालँडमधील बहुतेक पारंपारिक पदार्थ मांसापासून बनवले जातात. येथील जेवणात मिरच्या आणि मसाल्यांचा वापर जास्त केला जातो.
उकडलेल्या भाज्या आणि भातासोबत मसालेदार चटण्या हे येथील जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्मोक्ड मांस आणि मासे ही नागा संस्कृतीची ओळख आहे. येथील लोक हे पदार्थ खूप आवडीने खातात.