कोपरगाव :- दहेगाव येथील वैशाली संदीप अनर्थे (वय ३२) हिस पती, सासू-सासरे यांनी घर बांधण्याकरिता माहेरून १५ हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला.
या संदर्भात मृत वैशाली संदीप अनर्थे हिचा भाऊ नीलेश आनंदराव कांबळे (महादेवनगर) यांनी पती संदीप भाऊसाहेब अनर्थे, सासू रत्नाबाई व सासरे भाऊसाहेब यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्रासाला व छळाला कंटाळून वैशालीने ४ सप्टेंबरला आत्महत्या केली.