EPFO सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट ! आता निवृत्त होण्याआधीच पीएफ अकाउंट मधील सर्व पैसा काढता येणार, कधी होणार निर्णय ?

तुम्हीही नोकरी करता का? मग तुमच्यासाठी केंद्रातील सरकारकडून लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय पीएफ अकाउंट होल्डर कर्मचाऱ्यासाठी अधिक खास ठरणार आहे. 

Published on -

EPFO New Rules : केंद्रातील सरकारकडून ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही ईपीएफओ सदस्य असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर प्रत्येक नोकरदार वर्गाचे पीएफ अकाउंट असते.

या पीएफ अकाउंट मधून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापली जाते आणि तेवढीच रक्कम नियोक्ता म्हणजे कंपनीकडून देखील या खात्यात जमा केली जाते आणि ही सर्व रक्कम निवृत्तीनंतर किंवा नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळते.

याशिवाय जर घर घेण्यासाठी किंवा लग्नासाठी पैशांची गरज भासली तेव्हा थोडीफार रक्कम PF अकाउंट मधून काढता येते. मात्र आता या नियमांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नव्या बदलामुळे निवृत्तीच्या आधीच कर्मचाऱ्यांना पीएफ अकाउंट मधील सर्व रक्कम काढता येणार आहे.

कसा असणार नवा नियम?

मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या नव्या बदलामुळे आता कर्मचाऱ्यांना प्रत्येक दहा वर्षांनी पीएफ अकाउंट मधील सर्व पैसा काढता येणे शक्य होणार आहे.

म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता पीएफ अकाउंट मधील पैसे काढण्यासाठी निवृत्त होण्याची किंवा नोकरी जाण्याची वाट पहावी लागणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही नोकरीत असतानाच पीएफ अकाउंट मधील पैसे आता काढू शकता.

विशेष म्हणजे पीएफ मधील सर्वच पैसा तुम्हाला काढता येणार आहे. नव्या प्रस्तावानुसार तुम्हाला प्रत्येक दहा वर्षांनी पीएफ अकाउंट मधील सर्व पैसा काढता येणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे या प्रस्तावावर आता केंद्रातील सरकारकडून गांभीर्याने विचार सुरू झाला आहे आणि आगामी काळात हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता आपण पीएफ काढण्यासंदर्भातील सध्याचे नियम काय आहेत याची माहिती पाहूयात.

सध्याचे नियम काय सांगतात ?

सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 58 व्या वर्षानंतर पीएफ अकाउंट मधील सर्व पैसा काढता येतो. याशिवाय नोकरी गेल्यानंतर पीएफ मधील पैसा काढता येतो. तज्ञ सांगतात की जर कर्मचारी दोन महिन्याहुन अधिक काळ बेरोजगार असेल तर अशा परिस्थितीत त्याला पीएफ अकाउंट मधील संपूर्ण रक्कम काढता येणे शक्य आहे.

याव्यतिरिक्त काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जसे की गंभीर आजारावरील उपचारासाठी कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंटमधील शिल्लक रक्कम किंवा सहा महिन्यांचा पगार यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम काढता येते.

घर खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ अकाउंट मधून 90% इतकी रक्कम काढता येते. स्वतःच्या, मुलाच्या किंवा भावंडाच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी सात वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ अकाउंट मधून 50% पर्यंतची रक्कम काढता येते.

याशिवाय एक महिना बेरोजगार राहिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ अकाउंट मधून 75% पर्यंतची रक्कम काढता येते. याशिवाय पीएफ अकाउंट संदर्भातील इतरही अनेक महत्त्वाचे नियम चेंज करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!