पारनेर : तालुक्यातील लोणीमावळापासून तीन किमी असणाऱ्या नाईकवाडी मळयातील भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या गोठयातील शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळया ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली.
माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये शेतीची कामे करत होती.
याचवेळी बिबट्याने शेळयांवर हल्ला चढवून त्यातील दोन शेळयांचा फडशा पाडला तर एक शेळी ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, शेळीचा आवाज आल्याने नाईकवाडी यांच्या घरातील लोकांनी घराकडे धाव घेताच बिबटयाने धूम ठोकली.
ही माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर
- Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे