Gold Rate : सोन खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ पाहायला मिळाली आहे. खरे तर या मौल्यवान धातूच्या किमतीत गेल्या दहा दिवसांच्या काळात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
दहा दिवसांपूर्वी अर्थातच 9 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 10 ग्रॅम मागे 660 रुपयांनी आणि 22 कॅरेट ची किंमत 600 रुपयांनी कमी झाली होती. नऊ तारखेला 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजाराच्या आसपास होती.

मात्र 10 जुलै ते 14 जुलै या दरम्यान सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ झाली. 14 तारखेला सोन्याची किंमत 99 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. यामुळे जून महिन्याप्रमाणे जुलैमध्ये देखील या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या वर जाणार असे वाटत होते पण 15 आणि 16 तारखेला पुन्हा एकदा या मौल्यवान धातूची किंमत कमी झाली.
मात्र काल अर्थातच 17 जुलै 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली. काल 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली. तसेच आज सुद्धा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या रेट मध्ये वाढ झालेली आहे.
18 जुलैला सोन्याचे रेट कसे आहेत ?
22 कॅरेट सोन्याचे रेट : आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे रेट 91 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये मात्र 22 कॅरेटचे रेट 91,130 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत.
24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत : आज 18 जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे रेट पुन्हा एकदा वाढले आहेत. या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे रेट 99 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये मात्र 24 कॅरेटचे रेट 99 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत.
18 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत : आज 18 जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचे रेट 74 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये मात्र 18 कॅरेटचे रेट 74 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत.