Mhada News : गेल्या काही वर्षांपासून मुंबईत घरं घेणं ही सामान्य लोकांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मुंबईतील घरांच्या किमती या सातत्याने वाढत आहेत. हेच कारण आहे की सर्वसामान्य जनता मुंबईबाहेर आपल्या हक्काच्या आशियानाच्या शोधात आहे. मुंबई बाहेर घर घेणाऱ्यांची संख्या अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अनेक जण नवी मुंबई परिसरात देखील घर खरेदी करण्यास प्राधान्य दाखवत आहे. दरम्यान नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडा कडून एक मोठा धमाका करण्यात आला आहे. Mhada फक्त 14 लाखांमध्ये नवी मुंबईत घर उपलब्ध करून देत आहे. यासाठी प्राधिकरणाच्या विभागीय मंडळाकडून नुकतीच एक लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल 5362 घरांसाठी आणि 77 भूखंडांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 293 घरे नवी मुंबई परिसरातील आहेत. दरम्यान आता आपण नवी मुंबई मधील घरांची किंमत आणि या घरांसाठी किती अनामत रक्कम भरावी लागू शकते याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.
नवी मुंबईतील या भागातील घरांचा लॉटरीमध्ये समावेश
मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने 5362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीसाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
तसेच या लॉटरीची संगणकीय सोडत सप्टेंबर मध्ये निघणार आहे. दरम्यान यामध्ये नवी मुंबईतील दिघा, सानपाडा, नेरुळ, घणसोली आणि गोठेघर या भागातील घरांचा समावेश करण्यात आला आहे. या लॉटरीमध्ये नवी मुंबई मधील एकूण 293 घरे समाविष्ट आहेत.
नवी मुंबई मधील म्हाडाच्या घरांच्या किमती कशा आहेत?
सानपाडा, नवी मुंबई : DPVG Ventures LLP येथील एकूण 36 घरांचा यात समावेश आहे. ही घरे अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटासाठी असून अत्यल्प गटातील घरांची किंमत 14 लाखांपासून सुरू होते आणि अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 18 लाखांपासून सुरू होते. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 5590 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 10590 अनामत रक्कम आणि अर्ध शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. यामध्ये अल्प उत्पन्न गटातील 17 आणि अत्यल्प उत्पन्न गटातील 19 घर आहेत.
नेरुळ : पिरॅमिड डेव्हलपर्स येथील 18 घरे या लॉटरीमध्ये आहेत. ही सर्व घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत आणि घरांची किंमत 23 लाखांपासून सुरू होते. ह्या घरांसाठी अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क असे एकूण दहा हजार 590 रुपये भरावे लागणार आहेत.
दिघा : बीकेएस गॅलेक्सी रिएलेटर्स LLP दिघा या प्रकल्पातील एकूण 112 घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट आहेत. ही घरे अत्यंत उत्पन्न गटासाठी आहेत आणि घरांची किंमत 18 लाखांपासून सुरू होते. अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क असे एकूण 5,590 रुपये ह्या घरांसाठी भरावे लागणार आहेत.
गोठेघर : येथील एकूण 36 सदनिका या लॉटरीमध्ये समाविष्ट आहेत. या सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असून घरांची किंमत 36 लाखांपासून सुरू होते. या घरांसाठी दहा हजार 590 रुपये अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
घणसोली : नीलकंठ इन्फ्राटेक घनसोली येथील 21 घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट आहेत आणि घरांची किंमत 23 लाखांपासून सुरू होते. या सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच या घरांसाठी अर्जदारांना दहा हजार 590 रुपये अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत.
सानपाडा : कामधेनु ग्रँड्युअर या प्रकल्पातील एकूण 17 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील घरांची किंमतही 23 लाखांपासून स्टार्ट होते आणि या घरांसाठी अर्जदारांना 10590 अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क द्यावे लागेल.
घणसोली : नीलकंठ इन्फ्राटेक प्रकल्पातील आणखी 18 सदनिका यामध्ये समाविष्ट आहेत आणि या सदनिका सुद्धा अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. या घरांची किंमत 16 लाखांपासून सुरू होते आणि अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क असे दहा हजार 590 रुपये भरावे लागणार आहेत.