अहमदनगर ब्रेकिंग : शॉटसर्किटमुळे २ एकरांवरील ऊस खाक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-आश्वी खुर्द येथील शेतकरी शिरीष हरिभाऊ सोनवणे यांचा गळितासाठी आलेला २ एकर ऊस वीजवाहक तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

सोनवणेवस्ती येथील तारा कमकुवत झाल्याने शुक्रवारी त्यांचे घर्षण झाले. तार तुटून आगीचा लोळ उसात पडल्याने पाचटाने पेट घेतला. काही क्षणात २ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

पद्मश्री डॉ. विखे कारखान्याचा अग्निशमन बंब, तसेच माधव भोसले, संतोष सोनवणे, डॉ. संजय सोनवणे, संपत मोरे, तुषार सोनवणे,

सुरेश सोनवणे, बाबासाहेब शिनारे, सुयोग सोनवणे, हरिभाऊ सोनवणे आदींनी आग शमवण्यासाठी प्रयत्न केले. शेजारचा ऊस त्यामुळे वाचला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News