फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या शहराचे नामकरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदलण्यात येणार आहे.

Maharashtra News : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती.

दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या शहराचे नामकरण केले जाणार अशी मोठी घोषणा केली. 

या शहराचे नाव बदलणार

खरे तर 30 जून 2025 पासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन आज 18 जुलै 2025 रोजी समाप्त होत आहे. या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यंदाचे पावसाळी अधिवेशन अधिक तापलेले दिसलें.

या अधिवेशनात विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरले. दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मधील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

मंत्री भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली असून आता इस्लामपूर शहराच्या नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी केंद्र सरकार दरबारी वर्ग होणार आहे. 

इस्लामपूरच्या नामकरणाचा विषय पाच दशकांचा 

खरे तर इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपुर व्हावे ही मागणी फारच जुनी आहे. इस्लामपूरच्या नामकरणाचा विषय हा जवळपास चार ते पाच दशकांचा म्हणजेच 40 ते 50 वर्ष जुना आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणता चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच आरएसएसचे तत्कालीन इस्लामपूरचे प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे अशी मागणी केली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा डिसेंबर 1986 मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकातील एका जाहीर सभेत या शहराला ईश्वरपुर असे संबोधले होते.

दरम्यान आता ही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे केले असून याबाबतचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!