विकेल तेच पिकेल, असा निश्चय सर्व शेतकऱ्यांनी करावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जे विकेल तेच पिकेल, असा निश्चय शेतकऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी केले.

राहुरी पंचायत समितीत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत स्मार्ट प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया नियम, अटी या संदर्भात शेतकरी गट व नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

या अभियानाबाबत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी यांनी स्मार्ट प्रकल्पाची तयारी कशी करावी व येणाऱ्या अडचणी याबाबत संवाद साधत शंका निरसन केले. श्रीरामपूर उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे म्हणाले, हा स्मार्ट प्रकल्प शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, तर सूत्रसंचालन कृषी सहायक चंद्रकांत म्हसे यांनी केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, राहुल ढगे, विनया बनसोडे, तुळशीराम पवार, एकनाथ वने, अविनाश घुले,

डॉ. दत्तात्रय वने, अनिल गावडे, स्वप्नील भास्कर, राणू आंबेकर, दत्तात्रय तरटे, भारत कातोरे, रायभान गायकवाड, शरद लांबे, दुर्गा सहाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्मार्ट प्रकल्प समन्वयक प्रकाश आहेर, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक धीरज कदम व अमोल आंधळे यांनी परिश्रम घेतले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment