भारतातील सर्वात श्रीमंत टॉप 8 व्यक्तींची यादी आली समोर ! पहिल्या नंबरवर कोण ?

भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप आठ व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली असून आज आपण याच लोकांची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

Published on -

India’s Richest Man : भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप आठ व्यक्तींची यादी समोर आली आहे. खरेतर ‘फोर्ब्स’ ने अलीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार आज आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहोत. भारतातील सर्वात श्रीमंत टॉप आठ व्यक्ती कोण आहेत याची माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.

हे आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत 

लक्ष्मी मित्तल : भारतातील सर्वात श्रीमंत टॉप आठ व्यक्तींमध्ये ArcelorMittal चे लक्ष्मी मित्तल हे नाव आठव्या क्रमांकावर येते. ‘फोर्ब्स’ कडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी मित्तल यांच्याकडे एकूण 18 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. 

कुमार मंगलम बिर्ला : भारतातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला यांच्या नावाचा ही समावेश होतो. देशातील सर्वात श्रीमंत टॉप आठ लोकांमध्ये कुमार मंगलम बिर्ला हे सातव्या क्रमांकावर येतात. बिर्ला यांच्याकडे एकूण 22 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत.

इथे बिर्ला ग्रुप हा भारतातील सर्वात मोठ्या जागतिक समूहांपैकी एक आहे. ते बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे कुलपती सुद्धा होते. 2022 पर्यंत त्यांची संपत्ती 17.5 अब्ज रुपये इतकी होती मात्र आता ही संपत्ती 22 अब्ज रुपये इतकी झाली आहे.

सायरस पूनावाला : भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत पूनावाला यांचे नाव सहाव्या क्रमांकावर येते. पुनावाला यांची एकूण संपत्ती 25 अब्ज रुपये इतकी आहे. पूनावाला यांनी 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली आणि ही कंपनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी बनली. पूनावाला हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आहेत. 

दिलीप सांघवी : भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दिलीप सांघवी यांचा पाचवा क्रमांक लागतो. सन फार्मा कंपनीचे दिलीप सांगवी यांच्याकडे एकूण 26.7 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. 

सावित्री जिंदाल व कुटुंब : ओ पी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचा चौथा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे एकूण 38 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. 

शिव नादर : HCL टेक्नॉलॉजीचे शिवनादर हे सुद्धा भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत येतात. शिव नादर यांचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. अंबानी आणि अदानी यांच्यानंतर शिव नादर हेच भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एकूण 40 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

गौतम अदानी : भारतातील टॉप आठ श्रीमंत लोकांमध्ये गौतम अदानी यांचा दुसरा नंबर लागतो. मुकेश अंबानी यांच्यानंतर सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणजेच गौतम अदानी. गौतम अदानी हे काही काळ आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते. मात्र नंतर मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा त्यांना ओव्हरटेक केले. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्याकडे एकूण 85 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. 

मुकेश अंबानी : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी. ते भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 112 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे काळी काळ जगातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीत होते. मात्र आता ते जगातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीतून बाहेर आहेत. पण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आजही ते पहिल्या नंबरवर आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!