अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-रिलायन्स जिओने बाजारात पाय ठेवल्यापासून एयरटेल, व्होडाफोन, आयडिया अशा कंपन्यांना फार मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओचा सुरवातीपासूनचा प्रवास अतिशय वेगवान राहिला असून अजूनही तो कायम राहिला आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जिओने ७३ लाख नवे ग्राहक जोडले असून युजर्सची एकूण संख्या ४० कोटी ५६ लाखांवर पोहोचली आहे. याच काळात जिओने कमाईचाही विक्रम केला आहे. शुक्रवारी रिलायन्स उद्योगाच्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली गेली. त्यानुसार जिओने प्रत्येक युजर मागे महिना १४५ रुपये कमाई केली आहे.
एका देशात 40 कोटींपेक्षा जास्त ग्राहक बनविणारी जिओ जगातील पहिली कंपनी बनली आहे. रिलायन्स जिओनुसार कंपनीचा युजरबेस हा 40.56 कोटी झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ आणि रिटेल व्य़वसायात कंपनीने गेल्या
६ महिन्यांत मोठ्या वाढीसह रिलायन्स ग्रुपमध्ये अनेक रणनीतिक आणि आर्थिक गुंतवणूकदारांचे स्वागत केले आहे. गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओचा शुद्ध नफा या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तिपटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला लाभ 2844 कोटी रुपये झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 990 कोटी रुपयांचा लाभ झाला होता. तिमाहीच्या आधारे ही वाढ 12.85 टक्के एवढी आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला 2520 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. काही दिवसापूर्वी जिओने मोबाईल युजरसाठी मेड इन इंडिया वेब ब्राऊझर लाँच करण्याची घोषणा केली आहे.
त्यात युजरच्या डेटा प्रायव्हसी आणि युजर कम्फर्टची काळजी घेतली गेली आहे. आगामी काळात जिओ ५ हजार पेक्षा किंमी किमतीचे ५ जी स्मार्टफोन उपलब्ध करून देणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved