सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ! खाद्यतेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ ; पामतेल, सूर्यफूल, शेंगदाणे, सोयातेल खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागतात ?

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांच्या काळात खाद्यतेलाच्या रेटमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Published on -

Edible Oil Prices : वाढत्या महागाईमुळे होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर आणि इंधनाचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याशिवाय इतरही जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. अशातच आता खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. खरे तर गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर च्या सुमारास खाद्यतेलाच्या किमतीत वाढ सुरू झाली. म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीच्या आधीपासून खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आणि आताही खाद्यतेलाचे रेट तेजीत आहेत. करडई, पामतेल अशा तेलांचे रेट वाढलेले आहेत. तर काही तेलांचे रेट स्थिर आहेत आणि काही तेलांचे रेट थोडे कमी झाले आहेत.

यात करडई तेलाचे दर सर्वाधिक वाढले असल्याचे सांगितले गेले आहे. दिवाळीच्या सुमारास 280 रुपये प्रति लिटरने विकले जाणारे करडई तेलाची किंमत 10 लिटर मागे तब्बल 300 रुपयांनी वाढली आहे. याशिवाय सर्वसामान्य लोकांच्या आहारात सर्वाधिक समावेश असणाऱ्या पामतेलाचे रेट देखील गेल्या काही महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पाम तेलाचे रेट दहा लिटर मागे 80 रुपयांनी वाढले आहेत.

दरवाढीचे कारण ठरत आहे युद्धजन्य स्थिती

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या किमतीमध्ये जगभरात वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सतत वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानात तणावाची स्थिती तयार झाली होती. यामुळे खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली होती पण तणावाची परिस्थिती निवडल्यानंतर खाद्य तेलाचे रेट कमी होणार अशी आशा होती. मात्र मागील आठवड्यात थंड झालेले इराण-इस्राईल युद्ध पुन्हा एकदा भडकले आहे आणि यामुळे आपल्या देशात येणारा खाद्यतेलाचा पुरवठा परत कमी झाला.

हेच कारण आहे की सध्या तेलाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांनी असे सांगितले आहे की युद्धामुळे भारतात येणाऱ्या तेलाचे सौदे होऊनही तेलाचे जहाज अद्यापही भारतात पोहोचू शकलेले नाही. युद्धामुळे तेलाचे जहाज हे कांडेला बंदरात थांबून आहेत. एवढेच नाही तर या युद्धजन्य परिस्थितीमुळे पामतेलाचे तब्बल 40 टक्के सौदे रद्द झाले आहेत आणि म्हणूनच पामतेलाचे रेट लिटर मागे आठ रुपयांनी वाढले आहेत. आता आपण खाद्यतेलाचे लेटेस्ट रेट चेक करणार आहोत.

खाद्यतेलाचे लेटेस्ट रेट कसे आहेत?

सूर्यफुल तेलाचे रेट गेल्या काही दिवसांपासून 140 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. सोयाबीन तेलाचे रेट देखील 130 रुपये प्रति लिटर वर स्थिर आहेत. मात्र पामतेलाचे रेट 120 रुपयांवरून 128 रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे सरकी तेलाचे रेट 140 रुपयांवरून 130 रुपयांवर घसरले आहेत म्हणजेच सरकी तेलाचे रेट लिटर मागे 10 रुपयांनी कमी झाले आहेत. शेंगदाणा तेलाचे रेट गेल्या काही काळापासून 180 रुपयांवर स्थिर आहेत. करडई तेलाचे रेट मात्र 280 रुपयांवरून थेट 310 रुपयांवर पोहोचले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!