सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल! 20 जुलै रोजी दहा ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा..

सोन आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खास राहणार आहे. खरंतर सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.

Published on -

Gold Rate Today : गेल्या महिन्यात अर्थातच जूनमध्ये सोन्याच्या किमती बरेच दिवस एक लाखाच्या वर होत्या. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली. सोन्याच्या किमती एका लाखाच्या खाली आल्यात. तेव्हापासून या मौल्यवान धातूची 10 ग्रॅमची किंमत एका लाखाच्या खालीच होती.

दरम्यान आता पुन्हा एकदा जून महिन्याप्रमाणे जुलैमध्ये देखील या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाहून अधिक झाली आहे. काल 19 जुलै 2025 रोजी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली. 19 जुलै रोजी 22 कॅरेटची किंमत सहाशे रुपयांनी आणि 24 कॅरेटची किंमत 660 रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढली.

महत्वाची बाब म्हणजे आजही सोन्याची किंमत तेजीतच आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वसई विरार, भिवंडी यांसारख्या प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट कसे आहेत याची माहिती घेऊयात. सोबतच सध्या चांदीच्या किमती कशा आहेत याचा सुद्धा आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट 

मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, ठाणे आणि कोल्हापूर : या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट ची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट ची किंमत एक लाख 40 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. म्हणजेच 18 जुलै च्या तुलनेत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत अनुक्रमे 600 आणि 660 रुपयांची वाढ झाली आहे. 

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट ची किंमत 91 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट ची किंमत एक लाख 70 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे. म्हणजेच 18 जुलै च्या तुलनेत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत अनुक्रमे 600 आणि 660 रुपयांची वाढ झाली आहे. 

चांदीचे रेट कसे आहेत ?

मिळालेल्या माहितीनुसार 18 जुलै 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख 13 हजार 900 रुपये प्रति किलो अशी होती. मात्र आज 20 जुलै 2025 रोजी या किमतीत 2100 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपये प्रति किलो अशी आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!