‘ह्या’ तालुक्यात चाललंय काय ? गुटखा विक्री नंतर आता अवैध दारूचा महापूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात गावोगाव पर्यंत पाळेमुळे रुजलेला गुटख्याच्या अवैध व्यवसाय अजूनही थांबवता आलेला नाही अन आता या खालोखाल अवैध दारू धंद्याने देखील डोके वर काढले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापासून स्थानिक पोलीसांपर्यंतचे अधिकारी आणि पथक हे वारंवार कारवाईसाठी जात असले तरी तालुक्यातील अनधिकृतपणे हॉटेल ,ढाबा यावर विक्री होणारी देशी विदेशी दारू बंद होत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील 115 गावांचा भार पोलिसांवर असल्याने सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा उपस्थित राहील,

अशी व्यवस्था नसल्याने परणामी अवैध व्यवसाय करणार्‍यांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना कसरत करावी लागते. शहरासह तालुक्यात असलेले ढाबे आणि हॉटेलमध्ये सर्रासपणे देशी आणि विदेशी दारू विक्री होत आहे. वाईन्स आणि परमीट रुम बियरबार हे थोडेच आहेत.

त्यात मद्य पिण्याचा परवाने असलेले व्यक्ती तालुक्यात बोटावर मोजता येतील एवढेच असले तरी दारू पिणार्‍यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह तालुक्यातील विविध गावांत गुटख्याची पोहोच डिलेव्हरी दिली जात आहे. पान टपर्‍यावर राजरोस पणे गुटखा विक्री होत आहे.

या टपर्‍यांपर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा पोहोच देणारी यंत्रणा काम करत आहे. या सर्वांवर कारवाई कधी होणार आणि हा तरुणाईला बरबाद करणारा अवैध धंदा बंद कधी होणार याबाबत चर्चा जनमानसात होऊ लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment