‘ह्या’ 7 जिल्ह्यांमधील 335 गावांमधून धावणार बुलेट ट्रेन ! नव्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार, पहा….

एकीकडे, मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, तर दुसरीकडे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशात दुसरा नवा बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर विकसित होणार असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

Published on -

India’s New Bullet Train : गेल्या काही वर्षांपासून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अगदीच युद्धपातळीवर सुरू असून या प्रकल्पाचे गुजरातमधील बहुतांश काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. महत्त्वाची बाब अशी की 2026 मध्ये मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्याची दाट शक्यता आहे.

म्हणजेच पुढील वर्षी मुंबई – अहमदाबाद मार्गावर प्रत्यक्षात बुलेट ट्रेन धावताना दिसणार आहे. तथापि हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित होण्यासाठी 2026 नंतरही काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अशी सगळी परिस्थिती असताना आता दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान नवा बुलेट ट्रेन मार्ग तयार होणार असल्याची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावित मार्गासाठीचा डीपीआर सुद्धा रेडी झाला आहे.

या डीपीआर नुसार दिल्ली – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर राजस्थान मधून जाणार आहे आणि यामुळे राजस्थानचे बुलेट ट्रेनचे स्वप्न येत्या काही वर्षांनी प्रत्यक्षात सत्यात उतरणार आहे. खरे तर, या कॉरिडॉरचा बहुतांशी भाग हा राजस्थानमधलाच राहणार आहे. दरम्यान आता आपण हा बुलेट ट्रेन कॉरिडॉर कसा असेल याचा थोडक्यात आढावा घेऊयात.

दिल्ली – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर कसा असणार?

मीडिया रिपोर्टनुसार दिल्ली – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डीपीआर नुकताच तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा डीपीआर पूर्ण झाला असल्याने आता हा डीपीआर मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येईल.

या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमुळे दिल्ली ते अहमदाबाद यादरम्यानचा 14 तासांचा प्रवास अवघ्या साडेतीन ते चार तासांमध्ये पूर्ण करता येईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय. हा बुलेट ट्रेन कॉरिडॉर राजस्थान मधील सात जिल्ह्यांमधून जाणार आहे.

कॉरिडोरची एकूण लांबी 875 किलोमीटर इतकी राहणार आहे आणि यापैकी जवळपास 657 किलोमीटर लांबीचा कॉरिडोर हा एकट्या राजस्थानमधून जाणार आहे. दिल्लीतील द्वारका सेक्टर 21 पासून या कॉरिडॉरची सुरूवात होईल आणि राजस्थानच्या सात जिल्ह्यांमधील एकूण 335 गावांमधून हा मार्ग जाणार आहे.

ही बुलेट ट्रेन प्रवाशांना राजस्थान राज्याच्या समृद्ध वारशाची झलक दाखवणारी ट्रेन ठरणार आहे. या हाय स्पीड ट्रेनमुळे राजस्थानच्या पर्यटनाला आणखी बळ मिळणार आहे. ही ट्रेन जयपूर, अजमेर, उदयपूर आणि चितोडगड सारख्या प्रमुख शहरांना जोडेल, जे की प्रवासामधील लोकप्रिय ठिकाण राहणार आहेत.

दिल्ली – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर किती स्टेशन असणार?

दिल्ली – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर सारखाच एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक आहे. दिल्ली – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर राजस्थानच्या अलवर, जयपूर, अजमेर, भिलवाडा, चितोड, उदयपूर आणि डुंगरपूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणण्यानुसार दिल्ली आणि अहमदाबाद दरम्यानच्या या कॉरिडोरवर एकूण 11 स्थानके तयार करण्याची योजना आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल नऊ स्टेशन हे राजस्थानमध्ये राहणार आहेत. म्हणजेच हा मार्ग राजस्थानच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

यामुळे राजस्थानच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होतोय. या कॉरिडोरवर राजस्थानमधील जयपूर, अजमेर, बेहरोर, शाहजहानपूर, विजयनगर, भिलवाडा, चितोड, उदयपूर आणि खेरवाड या ठिकाणी स्थानिक विकसित केले जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!