PNB FD : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सरकारी, स्मॉल फायनान्स बँक आणि खाजगी बँकांकडून सातत्याने फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले जात आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडील काही महिन्यात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि याचाच परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले जात आहेत.
एकीकडे बँकांकडून फिक्स डिपॉजिटचे व्याजदर कमी केले जात आहे तर दुसरीकडे बँका विविध कर्जांचे व्याजदर देखील कमी करत आहे. यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळतोय तर गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

पण अशी सगळी परिस्थिती असतानाही आजही 390 दिवसांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पंजाब नॅशनल बँकेकडून चांगला परतावा दिला जात आहे.
म्हणून आज आपण पीएनबीमध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने 390 दिवसांसाठी 6 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट केले तर त्याला किती व्याज मिळणार याचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकची फिक्स डिपॉझिट योजना
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची फिक्स डिपॉझिट योजना ऑफर करते. ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेकडून विविध कालावधीच्या फिक्स डिपॉझिट वर 3.25 टक्यांपासून ते 7.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जात आहे.
यामुळे जर तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एफडी करायची असेल तर तुमच्याकरिता पंजाब नॅशनल बँकेचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. पीएनबीकडून प्राप्त माहितीनुसार पीएनबी सध्या आपल्या सामान्य ग्राहकांना 390 दिवसांच्या एफडी साठी 6.70% दराने व्याज ऑफर करत आहे.
पण, पीएनबी बँकेकडून सीनियर सिटीजन ग्राहकांना अर्थातच ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिकचे व्याज दिले जात आहे.
पीएनबी बँक सीनियर सिटीजन ग्राहकांना 390 दिवसांच्या फिक्स डिपॉजिट योजनेवर 0.50% अधिकचे व्याज ऑफर करते, अर्थातच सीनियर सिटीजन ग्राहकांना 390 दिवसांचा एफडी साठी 7.20% दराने व्याज दिले जात आहे.
सहा लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
जर समजा सामान्य ग्राहकांनी पीएनबी बँकेच्या 390 दिवसांच्या एफडी योजनेत सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर 6 लाख 44,146 मिळणार आहेत म्हणजेच 44,146 रुपये सदर ग्राहकाला व्याज म्हणून मिळतील.
तसेच जर समजा या कालावधीत सीनियर सिटीजन ग्राहकांनी सहा लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर 6 लाख 47 हजार 536 मिळणार आहेत. म्हणजेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना 6 लाखाच्या गुंतवणुकीवर 47 हजार 536 रुपयांचे व्याज मिळणार आहे.