Maharashtra News : महाराष्ट्रात लंडन, न्यूयॉर्क सारखे जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. राज्यातील नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे.
खरे तर नवी मुंबई विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आधुनिक आणि अगदीच प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहे.

30 सप्टेंबर 2025 पर्यंत नवी मुंबई येथील भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. फडणवीस यांनी नुकतीच या विमानतळाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.
किती झाले काम ?
मीडिया रिपोर्टनुसार नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भौतिक काम 94% पर्यंत पूर्ण झाले आहे आणि उर्वरित सहा टक्के काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
सध्या या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रोजेक्ट अंतर्गत विमानतळाचा छताचा भाग (सेसिलिंग) आणि अंतिम टप्प्यातील अंतर्गत डिझाईनचे काम केले जात आहे. जे की येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर मग हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी सुरू होईल.
हे विमानतळ प्रवाशांसाठी सुरू झाल्यानंतर देशातलेच नव्हे तर आशियातील एक महत्त्वाचे हवाईदालन ठरणार असा विश्वास देखील मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला आहे.
प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना बॅगेज ट्रॅकिंगसाठी 360 डिग्री बारकोड स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
इथे जगातील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या बॅगेज सिस्टीमपैकी एक अशी सिस्टीम कार्यान्वित केली जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. या विमानतळावर ऑटोमेटेड वॉकवे सुद्धा राहतील.
त्यामुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचण भासणार नाही असा विश्वास व्यक्त होतोय. या विमानतळावर पोहोचण्यासाठी नवीन मेट्रो मार्ग आणि नवीन जलमार्ग सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
या विमानतळावर पोहचताना प्रवाशांना कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही. या भव्य अशा विमानतळ प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल अशीही माहिती समोर येत आहे.