फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम वापरताना ‘या’ चुका टाळाच; अन्यथा थेट जेलवारी!

Published on -

आजच्या युगात सोशल मीडियाविना आयुष्याची कल्पनाही कठीण आहे. फेसबुक, युट्यूब, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात, मनोरंजन देतात, अगदी कमाईचाही स्रोत बनतात. मात्र याचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता असते. अनेकजण अनावधानाने किंवा अज्ञानाने असे काही टाकतात, जे IPC आणि IT कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट

पहिली गोष्ट म्हणजे द्वेषजनक किंवा जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट. कोणत्याही धर्म, जात किंवा समुदायाविरोधात काही लिहिल्यास किंवा फोटो/व्हिडिओ शेअर केल्यास, त्यावर कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावर अनेकजण ‘फ्रीडम ऑफ स्पीच’च्या नावाखाली द्वेष पसरवतात, मात्र भारतीय कायद्यानुसार अशा पोस्टमुळे एफआयआर दाखल होऊ शकतो आणि तुरुंगवासही होऊ शकतो.

फेक न्यूज

दुसरी गंभीर बाब म्हणजे फेक न्यूज. अनेकजण कोणतीही बातमी पडताळणी न करता फॉरवर्ड करतात किंवा शेअर करतात. अशा खोट्या बातम्या वातावरण बिघडवू शकतात. पोलिसांनी सायबर गुन्ह्यांमध्ये यावर गंभीर दखल घेतली असून चुकीच्या माहितीमुळे अटक झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

महिलांविषयी अपमानास्पद कमेंट

तिसरा मुद्दा म्हणजे महिलांविषयी अपमानास्पद बोलणे किंवा त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणे. सोशल मीडियावर महिलांना खाजगी फोटो पाठवायला सांगणे, ट्रोल करणे किंवा अश्लील भाषेत बोलणे हे सायबर क्राईममध्ये मोडते. IT Act 67 आणि 354A अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे.

कॉपीराइट

चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉपीराइट. दुसऱ्याचे गाणे, लेख, फोटो किंवा व्हिडिओ त्याच्या परवानगीशिवाय पोस्ट करणे हा गुन्हा आहे. विशेषतः कंटेंट क्रिएटर्सनी याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. क्रेडिट न दिल्यास कॉपीराइट उल्लंघनाच्या प्रकरणात आर्थिक दंडासह तुरुंगवासाचीही शक्यता असते.

वैयक्तिक आणि आर्थिक तपशील

पाचवी आणि अनेकदा दुर्लक्षित बाब म्हणजे तुमचे वैयक्तिक आणि आर्थिक तपशील सोशल मीडियावर शेअर करणे. बँक तपशील, व्यवसाय व्यवहार, फॅमिली प्रॉपर्टीबाबत माहिती, किंवा तुमचे लोकेशन हे सायबर गुन्हेगारांसाठी निमंत्रण ठरू शकते. हॅकिंग, फसवणूक, ओळख चोरी यासारख्या गुन्ह्यांना यामुळे हातभार लागू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!