शेवगाव : आपल्याविरुद्ध बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने सध्या ते सोशल मीडियावर काही लोकांमार्फत टीका -टिपण्णी करत आहेत. कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे लक्ष देऊ नये.
आगामी निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची व सन्मानाची आहे, असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांनी केले.

तालुक्यातील शहरटाकळी येथे दहिगाव ने पंचायत समिती गणातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्ता मेळावा सोमवार दि.९ रोजी पार पडला, या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. राजळे बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठनेते बापूसाहेब भोसले होते. या वेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, माजी जिल्हा सरचिटणीस वाय.डी. कोल्हे, वैभव महाराज माळवदे, नगरसेवक अरुण मुंढे, बंडू रासने,
अशोक अहुजा, उदय शिंदे, लक्ष्मण काशीद, ताराचंद लोढे, कल्याण जगदाळे, बंडू पठाडे, चेअरमन विशाल गवारे, संदीप खरड, भीमराज सागडे, माणिकराव लोढे, कचरू चोथे, कैलास सोनवणे, अशोक निंबाळकर, सुभाष बरबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
- रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!
- मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा
- भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?
- फेंगशुईनुसार बनवा घरातील किचन, कायम बरसेल धन-सुखाची कृपा!
- सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?