रुद्राक्ष धारण करणं म्हणजे केवळ एक धार्मिक सवय नव्हे तर ती एक आध्यात्मिक शिस्त आहे. बरेच लोक रुद्राक्ष फक्त गळ्यात घालायचीएक धार्मिक वस्तू म्हणून घेतात, पण खरं पाहता यामागे खूप खोल अर्थ आणि कठोर नियम लपलेले आहेत. रुद्राक्ष घालणं म्हणजे आपल्या जीवनात शुद्धतेची, संयमाची आणि सात्विकतेची एक जबाबदारी स्वीकारणं होय. त्यामुळे रुद्राक्ष धरब करण्यापूर्वी त्याचा खरा अर्थ आणि त्यासाठी लागणारी शिस्त समजून घेणं खूप आवश्यक आहे.

सनातन धर्मात रुद्राक्षाला परम पवित्र मानलं जातं. याला थेट भगवान शिवाच्या कृपेशी जोडलं जातं. असं मानलं जातं की रुद्राक्ष धारण केल्याने शरीर, मन आणि आत्मा तिन्हीलाही शांती आणि संरक्षण मिळतं. अनेक प्रकारचे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास या धारणेनं दूर होतात असंही शास्त्र सांगतं. पण यामागचं एक गुपित म्हणजे रुद्राक्ष हे त्याच्या नियमांशी निष्ठा राखणाऱ्यालाच पूर्ण फल देतो.
रुद्राक्ष धारण करण्याचे नियम
प्रत्येकालाच रुद्राक्ष धारण करता येतो असं नाही. यासाठी काही विशिष्ट आचरण आणि नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रुद्राक्ष घालणाऱ्या व्यक्तीनं मांसाहार आणि मद्य या दोन्हीपासून संपूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. कारण या प्रकारचं सेवन केल्यास रुद्राक्षाची शुद्धता भंगते आणि त्याचा परिणाम उलट होतो. असं म्हटलं जातं की अशुद्ध अवस्थेत रुद्राक्ष तुटण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे शुभऐवजी अशुभ परिणाम भोगावा लागतो.
शिव भक्तांसाठी आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे अंत्ययात्रा किंवा शोकसंस्कारांपासून दूर राहणं. जर अशी वेळ आलीच, तर रुद्राक्ष काढून ठेवावा आणि नंतर स्नान करून, गंगाजलाने शुद्धी करूनच परत धारण करावा. यामागील कारण म्हणजे रुद्राक्ष हे सतत सात्विक ऊर्जा शोषण करत असतो आणि अशुद्ध वायुमंडळ त्याच्यावर नकारात्मक परिणाम करतो.
रुद्राक्ष ठेवण्याचे स्थान
रुद्राक्ष कधी काढावं लागलं, तर तो कुठे ठेवावा, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तो कुठेही सहज ठेवणं चुकीचं आहे. मंदिर किंवा घरातील पवित्र जागा जिथे शांतता आणि देवतेचं वास्तव्य आहे अशा ठिकाणीच तो ठेवावा. कारण अशा जागेचं स्पंदनच शुद्धतेनं भरलेलं असतं, जे रुद्राक्षाची उर्जा संतुलित ठेवतं.
महिलांनी जर रुद्राक्ष धारण केला असेल, तर मासिक पाळीच्या काळात तो घालणं टाळावं. कारण शरीरातील नैसर्गिक चक्रांमुळे त्या काळात शुद्धतेचा भंग होतो. त्यामुळे त्या काळात रुद्राक्ष बाजूला ठेवावा. नंतर गंगाजलाने शुद्धी करूनच परत घालावा.