मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.

आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
- नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याने खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे ! प्रकल्प अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
- माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली गटार दुर्घटनेत मृत पावलेल्या पवार व पिंजारी कुटुंबीयांची भेट
- NHPC Apprentice Job 2025: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 361 रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…
- श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?, कोणत्या राज्यात किती जिल्हे?, पाहा आकडेवारी