जिल्हा बॅकेमुळे शेतकऱ्यांचे थांबलेले अर्थचक्र सुरू – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जनतेवर कोरोणा संसर्ग विषाणूचा महाभंयकर संकट असतांना शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट येऊन उभ्यापिकांच संपूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा बॅक धावून आली. संचालक मंडळाने विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले.

थांबलेले अर्थचक्र सुरु झाले. अजुनपर्यंत राज्यशासनाचे कुठलेही अनुदान शेतकऱ्यांपर्यंत आले नाही. पिंपळगाव माळवी, आदर्श गाव मांजरसुंबा व डोंगरगाव या गावांसाठी सुमारे ११ कोटीचे खेळते भांडवल मंजुर केले. प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये कुठलेही पक्षीय राजकारण आणले जात नाही.

जनतेमध्ये गैरसमज करून वीष कालवण्याच काम कोणीही करू नये. मी आमदार असताना शासनाकडून विविध योजनेअंतर्गत मतदार संघच्या विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून आणला आहे. काही पुढारी मी मंजुर केलेले विकास कामाचेच उद्घाटने मंजुर करण्यात मग्न आहे.

तर काहींना शासनाने स्थगिती दिले आहे. मी जे काम करतो तेच सांगतो. यासाठी पुढाऱ्यांनी मंजुर झालेल्या विकास कामाच्या तारखा पाहून उद्घाटने करावी. राहुरी विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची विकास कामे मार्गी लावली. तसेच जलशिवार योजनेतून पाणी अडवण्याचे काम केले.

२५ वर्षाच्या आमदारकीच्या काळात बोगस नारळ फोडण्याचे काम मी कधीही केले नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. जिल्हाबॅकेच्या वतीने पिपळगाव माळवी, आदर्श गाव मांजरसुंबा व डोंगरगाव या गावांसाठी सुमारे ११ कोटीचे खेळते भांडवल मंजुर करून चेक वाटप करतांना

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले समवेत कृषी उत्पादन बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के संचालक दिलीप भालसिंग माजी जिल्हा परिषद संदस्य बाजीराव गवारे प्रताप झिने, गावचे सरपंच सुभाष झिने, जालींदर कदम, कैलास पठारे, गोरक्षनाथ कदम, छत्रपती बोरुडे, शाम पिंपळे, मनोज कोकाटे, संभाजी पवार,

उमेष डोंगरे, सुनिल गवारे, सागर भोपे, विश्वनाथ गुंड, संतोष झिने, एकनाथ गुंड, सागर गुंड, बापू बेरड, शशिकांत गायकवाड, छबुराव मते, बाबासाहेब कदम, अर्जुन कदम, इंद्रभान कदम आदी उपस्थित होते. प्रताप झिने म्हणाले की, सेवा सोसायटीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देता आला.

जिल्हा बॅकेच्या माध्यमातून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना संकटाच्या काळामध्ये आर्थिक साह्य देऊन मदत करण्याचे काम केला आहे. गेल्या दहा महिन्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज होती. ती गरज जिल्हा बँकेने ओळखून सर्वात आधी मदत करण्याचे काम केले आहे.

असे ते म्हणाले. विश्वनाथ गुंड म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गेल्या २५ वर्षामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले.

त्यांना विकास कामे सांगण्याची कधीही गरज पडली नाही. त्यामुळे आज ते आमदार नसले तरी आमची गावे त्यांच्याबरोबरच कायम आहे. जिल्हा बॅकेच्या माध्यमातून जे आर्थिक साह्य मिळत आहे त्यामुळे शेतकरऱ्यांना दुध व्यवसासाठी मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment