बेळगावी – मोबाइल वापरण्यास मनाई केल्याने मुलाने त्याच्या साठ वर्षीय बापाचा खून केल्याची घटना कर्नाटकातील ककाथी गावात सोमवारी सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापाचा खून करणाऱ्या मुलाचे नाव रघुवीर आहे.
खून केल्यानंतरही समाधान न झाल्याने तो बापाच्या मृतदेहाचे तुकडे करू लागला. घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मृत वडील तीन महिन्यांपूर्वीच पोलिस सेवेतून निवृत्त झाले होते.

वडिलांनी मुलास मोबाइल वापरू नको, असा सल्ला अनेकदा दिला. यामुळे संतप्त मुलगा रघुवीर याने रविवारी शेजारच्या घरावर दगड फेकत त्यांच्या घराचा काच फोडला होता. शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केल्याने पाेलिसांनी त्याला असे न करण्याची समज देत सोडून दिले होते.
रघुवीरने वडिलांचा खून करण्याआधी त्याच्या आईला एका खोलीत बंद केले होते. आईने कशीतरी या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
सांगितले जाते की, तो मोबाइल रिचार्ज करण्यासाठी वडिलांकडून पैसे मागत होता. यातूनच वाद वाढत गेला आिण मुलाने वडिलांचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.
- रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!
- मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा
- भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?
- फेंगशुईनुसार बनवा घरातील किचन, कायम बरसेल धन-सुखाची कृपा!
- सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?