भाजपमधील ‘त्या’ वादावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केला ‘असा’ खुलासा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- भाजप कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भूमिका नाही. पक्षाने प्रदेशस्तरावरून या निवडी केल्या असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यात स्थान देण्यात आले आहे, असे भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपच्या तालुकाध्यक्षपदी बबनराव मुठे, तर शहराध्यक्षपदी मारुती बिंगले यांची निवड झाली. या निवडीचा निषेध करत २३१ पैैकी २१३ बूथप्रमुखांनी, तर ४४ शक्ती केंद्रप्रमुखांनी पदाचे राजीनामे दिले. स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात नगरसेवक किरण लुणिया व अभिजित कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्यावर गंभीर आरोप केले.

कार्यकारिणी निवडीत निष्ठावंतांना डावलण्यात आले. ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला, त्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी श्रीरामपुरात पक्ष संपवला, असा आरोप यावेळी करण्यात आला. पक्षाच्या घटनेविरूद्ध जाऊन निवडी करण्यात आल्या.

ज्या पदाधिकाऱ्यांमागे कार्यकर्ते नाहीत, त्यांना महत्त्वाच्या पदांवर स्थान देण्यात आले. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांचाच त्यामागे हात असल्याची टीका करण्यात आली. त्यावर गोंदकर म्हणाले, लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांचे गैरसमज दूर करू. कार्यकारिणीवर निवडलेले पदाधिकारी संघटनेतीलच आहेत.

कोणीही बाहेरचा कार्यकर्ता नाही. निवडीचे अधिकार एका व्यक्तीला दिलेले नसतात. सामूहिकपणे निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. प्रदेशस्तरावर या सर्व प्रकाराची कल्पना देण्यात आली आहे. बूथप्रमुखांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत सविस्तर अहवाल सादर करू, असेही गोंदकर म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe