वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज व्हावे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद , गट, तट, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व कुरघोडीचे राजकारण सोडून आगामी काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिका निवडणुका ताकदीने लढविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव अनिल जाधव यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्हाच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,

पाथर्डी चे अरविंद सोनटक्के, जामखेड तालुकाध्यक्ष अतिष पारवे, सोमनाथ भैलूमे, बाळासाहेब कांबळे, संतोष जौजांळ, जेष्ठ कार्यकर्ते जिवनराव पारधे, जगुदादा गायकवाड, महेश आखाडे, सर्पमित्र आकाश जाधव यांच्यासह नगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील सर्व जातीधर्माचे किमान १०० कार्यकर्त्यांची फळी उभी करावी व स्थानिक पातळीवर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही अनिल जाधव यांनी दिली.

ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे गावकुसाबाहेर राहणाऱ्या आदिवासी, दलित, भटके विमुक्त समाजातील माणसांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तोच वारसा ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे चालवीत आहेत. मात्र सत्ता हाती असल्याशिवाय गोरगरीब, सर्व सामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत.

म्हणून आपण सर्वांनी मिळून सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे व हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी केवळ पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष संघटन वाढविण्याचे काम केले पाहिजे. प्रतिक बारसे म्हणाले, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपल्याला ग्रामपंचायत, पं

चायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकेत सत्ता कशी काबीज करता येईल यासाठी अहमदनगर दक्षिण जिल्हयातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या हस्ते प्रदेश महासचिव अनिल जाधव व आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद सोनटक्के जिवनराव पारधे,

बाळासाहेब कांबळे, संतोष जंजाळ, विशाल आठवले, सर्पमित्र आकाश जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिक बारसे यांनी प्रास्तविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. जगुदादा गायकवाड यांनी आभार मानले. या बैठकीस अमोल खाटमोडे, हरिभाऊ मोरे,

रणजित डंबाळे, आकाश कोरे, आदित्य पाचरणे, गौरव उजागरे, प्रबल पाचरणे, जयेश थोरात, आकाश लोखंडे, अनिल गुंजाळ, अनिल शिंदे, विकास घाडगे, दिनेश जाधव, सागर शिंदे, विवेक विधाते, धनंजय लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment