Post Office च्या ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक सुरु करा, 60 महिन्यांनी होणार 7,00,000 रुपयांची कमाई !

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेची माहिती पाहूयात.

Published on -

Post Office Scheme : गेल्या काही दिवसांच्या काळात देशभरातील विविध बँकांचे फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. एसबीआय, एचडीएफसी, युनियन बँक ऑफ इंडिया सहित सर्वच प्रमुख बँकांनी त्यांचे एफडी चे व्याजदर घटवले आहेत.

हेच कारण आहे की आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवत आहेत. अशा स्थितीत जर तुमचाही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेची माहिती पाहूयात. या योजनेत दरमहा ठराविक रक्कम गुंतवून 60 महिन्यांनी गुंतवणूकदारांना सात लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येऊ शकते. 

कशी आहे पोस्टाची आरडी योजना ?

पोस्ट ऑफिस कडून गुंतवणूकदारांसाठी आरडी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवता येते. ही योजना साठ महिन्यांची म्हणजेच पाच वर्षांची आहे.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 6.7% दराने व्याज दिले जात आहे. ज्या गुंतवणूकदारांना एकाच वेळी गुंतवणूक करता येणे अशक्य आहे अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना अधिक फायद्याची ठरते.

मात्र या योजनेचा व्याजदराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. म्हणजेच प्रत्येक तीन महिन्यांनी सरकारकडून या योजनेचे व्याजदर एकतर वाढवले जातात किंवा घटवले जातात नाही तर मग स्थिर ठेवले जातात.

ही योजना पाच वर्षांसाठीच आहे मात्र तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही योजना पुढे देखील सुरू ठेवू शकता. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्हाला या योजनेत जमा रकमेवर कर्ज सुद्धा मिळते.

या योजनेत जर तुम्ही एका वर्षाचा काळ पूर्ण केला म्हणजेच 12 हप्ते पूर्ण झाले तर तुम्हाला जमा झालेल्या राशीपैकी 50% रक्कम कर्ज स्वरूपात काढता येते.

मात्र कर्जावरील व्याजदर हा आरडीवरील व्याजदरापेक्षा दोन टक्के अधिक असतो. म्हणजेच सध्या जर आरडी वरील व्याजदर 6.7% इतका आहे तर कर्जावरील व्याजदर हा 8.7% इतका राहणार आहे.

दहा हजाराच्या गुंतवणुकीवर मिळणारा 7 लाखांचे रिटर्न 

 या योजनेत जर गुंतवणूकदारांनी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी 6.7% दराने गुंतवणूकदाराला सात लाख 13 हजार 659 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही 6 लाख रुपये इतकी राहणार आहे आणि उर्वरित पैसे म्हणजेच एक लाख 13 हजार 659 रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!