अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- बॉलिवूडमधील अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर येत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता विजय राज याला काल रात्री पोलिसांनी तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखील अटक केली आहे. विजय राज यानं त्याच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटातील कलाकार मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात काही दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असलेला आगामी चित्रपट ‘शेरनी’ची चित्रीकरण सध्या मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे.
या चित्रपटात विनोदी अभिनेता विजय राजदेखील महत्त्वाची भूमिका सकारात होते गोंदियातील हॉटेल गेटवे इथं विजय राज यांनी पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेलाय, पीडितेनं केलेल्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विजय राजवर विनयभंग केल्याप्रकरणी कलम ३५४(अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
दरम्यान, चित्रपटांत आपल्या अचूक टायमिंगमुळे विनोदी अभिनेता अशी ख्याती मिळवलेल्या विजय राज यांच्यावर अशा प्रकार आरोप झाल्यामुळे आणि त्यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.मूळच्या दिल्लीच्या या अभिनेत्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयाच्या ओढीने मुंबई गाठली.
करिअरच्या सुरुवातीला अनेक लहानमोठ्या भूमिका केल्या. ‘रन’ या 2004मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. ‘धमाल’ या चित्रपटातील त्याची भूमिका फार गाजली. अभिनयाव्यतिरिक्त तो व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम करतो.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved