अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर श्रीगोंद्याला नवे तहसीलदार मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालायात अन्न व वितरण अधिकारी प्रदीपकुमार पवार यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.
श्रीगोंद्याला येण्यासाठी अनेकांची फिल्डींग होती मात्र पवार यांनी ती भेदली. त्यांची तहसीलदार म्हणून पहिलीच नियुक्ती आहे. परंतु पवार यांच्याविरोधात सामान्यांसह नेत्यांची नाराजी वाढत आहे. कामांचा निपटारा करुन न्याय देण्याऐवजी पवार हे सामान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत सध्या केला जात आहे.
सामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र ते सामान्य लोकांशी नीट बोलत नाहीत. अशा तक्रारी थेट उमटत आहेत. त्यातच त्यांनी तहसीलदारांच्या दालनातील कामानिमित्त आलेल्या लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्याही काढल्याने नाराजीत भर पडली. काम घेवून आलेल्या लोकांना कारकुनाकडे लावले जाते.
त्यामुळे साहेबांकडून काम होण्याची अपेक्षा फोल ठरत असल्याने लोकांची नाराजी वाढली आहे. फेर फार उतारे मिळत नसल्याने लोकांचा संताप वाढला आहे. तहसील कार्यालयात शिस्त लावण्याऐवजी कर्मचारीही नाराज झाल्याने पवार यांनाही आता काम करणे अवघड होण्याची शक्यता आहे.
पवार यांना तालुक्यात असणारे टोकाच्या राजकारणापासून वाचावे लागेलच शिवाय सामान्यांच्या अपेक्षा पुर्ण कराव्या लागतील. महसूल विभागात लोकांची अडलेली कामांचा निपटारा करावा लागेल. मध्यंतरी माजी आमदार राहूल जगताप यांनी प्रलंबित नोंदीचा प्रश्न हाती घेतला होता. हा महत्वाचा विषय आहे.
पुरवठा विभागातील कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिधापत्रिका वेळेत मिळत नाहीत, त्यासाठी अनेक दलालांच्या रांगेतून जावे लागते असेही आरोप होत असल्याने पवार यांना लक्ष घालावे लागेल. त्यांच्यावर होणाऱ्या तक्रारीबाबत बोलताना तहसीलदार पवार म्हणाले,
श्रीगोंद्यात सामान्यांना न्याय देण्यासाठीच आलो आहे. कामाचा वाढता व्याप असल्याने काही बाबतीत लोकांकडे दुर्लक्ष होत असले तरी लोकांवर अन्याय होवू देणार नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved