नाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला श्रीरामपूरमधून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव पाटी (ता. येवला) येथील या महिलेच्या पतीचा दाेन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. ही महिला मेडिकल काॅलेजच्या उपाहारगृहामध्ये कामास आहे. तेथेच काम करणारा संशयित प्रवीण कृष्णा डोईफोडे (रा. कोणार्कनगर) या विवाहिताचे तिच्यासाेबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
पीडित महिला खामगाव येथे असताना संशयिताचे तिच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसांपासून ही महिला आडगाव येथील दुशिंग मळा येथे भाडेकरारावर राहत होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने संशयिताने तिला लग्नाचे आमिष दिले होते.
घटनेच्या दिवशी संशयित पीडितेच्या घरी गेला होता. तेथे दोघांचा वाद झाला. संशयिताने पीडितेला बेदम मारहाण करत डिझेल टाकून पेटवले.
- Samsung Galaxy : सॅमसंगचा ‘हा’ शक्तिशाली फोन ॲमेझॉनवर मिळत आहे खूपच स्वस्त, ग्रहांची खरेदीसाठी गर्दी…
- Ahmednagar News : उष्णता वाढली, पाणवठे आटले ! टंचाई तीव्र, टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट, कधी लागू होणार नवीन वेतन आयोग ?
- Ahmednagar Politics : पारनेर धोक्याचं की मोक्याचं ? एकीकडे विखेंची यंत्रणा व राजकीय बांधणी, दुसरीकडे लंकेही कार्यरत.. कोण कुणाचे काम करणार? पहा..
- IIT Bombay Bharti 2024 : IIT बॉम्बेमध्ये निघाल्या जागा, आजच येथे पाठवा अर्ज