मोठी बातमी : पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक करताना केले ‘असं’ काही ; कॅमेऱ्यात रेकॉर्ड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असूनपेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पात्रातून केला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली.

आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली.

त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना अलिबागला घेऊन गेले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment