आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले!

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- तत्कालीन लोकप्रतिनिधी गप्प राहिल्याने २००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा झाला. तालुक्याचे पाणी जायकवाडीला गेले हे त्याच लोकप्रतिनिधींचे पाप आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. 

वडाळा बहिरोबा येथे रविवारी रात्री विकासदिंडीत आयोजित सभेत मुरकुटे यांनी जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींवर पाटपाणी प्रश्नी जोरदार हल्ला चढवला.

तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जाेरावर संधी देण्याचे आवाहन करतानाच पाटपाणी प्रश्नावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना मुरकुटे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, समन्यायी पाणीपाटप कायदा झाला, त्या त्यावेळी जे-जे लाेकप्रतिनिधी होते ते शांत कसे राहिले. हा कायदा म्हणजे त्यांचेच पाप आहे. 

स्वातंत्र्यानंतर कोणत्याच लोकप्रतिनिधीने केला नाही एवढा विकास मी तालुक्यात करून दाखवला आहे. पाटपाणी, विजेचे प्रश्न सोडवल्याने तालुक्यातील जनतेला स्वाभिमानाने जगण्याची उर्मी मिळाली. साखर कारखानदारांत जनतेचा विकास करण्याची हिंमत नाही. या कारखानदारांनी उसाला ३४०० रुपयांचा भाव दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी ठणकावून केली.

समान पाणीवाटप कायद्याचे पाप २००५ च्या लोकप्रतिनिधींचे असल्याचा आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केल्याने व त्याची दिशा तत्कालीन लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे, शिवाजी कर्डिले, तसेच नरेंद्र घुले यांच्याकडे वळल्याने त्यांचे कार्यकर्ते संतापले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment