Ahilyanagar News : सोनई जवळील कांगोणी, ता. नेवासा शिवारात हिंगोणी येथील ज्ञानदेव बाळासाहेब खिलारी (वय ३५) यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, अशोक बाळासाहेब खिलारी, रा. हिंगोणी, ता. नेवासा यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात खबर दिली की दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी भाऊ ज्ञानदेव बाळासाहेब खिलारी हा कांगोणी शिवारातील महादेव मंदिराच्या मागील काटवनात मृतावस्थेत असल्याचे सुनील खिलारी यांनी फोन करून सांगितले.

घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व मृतदेहाजवळ हमला नावाची कीटकनाशकाची बाटली होती. तसेच मृतदेहाच्या उजव्या पायाला कुठल्यातरी प्राण्याने कुरतडलेले आहे. या खबरीवरून शिंगणापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आत्महत्या कि घातपात याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कारेगावकर पुढील तपास करत आहेत.